मुंबई : ‘अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा कोणताही शब्द दिला नव्हता. भाजप आणि शिवसेनेची युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन झाली होती. अजूनही वेळ गेलेली नाही, राज्यात युतीचं सरकार येऊ शकतं,’ अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ‘अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपच्या कोणत्याही नेत्याने चर्चा केली नव्हती’ असे वक्तव्य केले होते. गडकरी यांनीही त्याला दुजोरा दिला. तसेच, ‘ज्याच्या जास्त जागा आहेत त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल.’ असेही गडकरी म्हणाले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा