सोलापूर: कार्तिकी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या एका टेम्पोला सांगोलजवळ झालेल्या भीषण अपघात झाला. यामध्ये पाच वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.तर, दोघे गंभीर जखमी झाले. अपघातग्रस्त वारकरी बेळगावातील मंडोळी व हंगरगा गावचे रहिवासी आहेत.

अपघातग्रस्त टेम्पो बेळगावहून पंढरपूरकडे निघाला होता. या टेम्पोने विटांनी भरलेल्या एका ट्रॅक्टरला मागून धडक दिली. त्यात पाच जणांचा जागीच मृत्यूमुखी पडले. जखमींचा नेमका आकडा अजून समजलेला नाही. या प्रकरणी सविस्तर चौकशी सुरू आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा