कोलकाता : पश्चिम बंगालच्या खाडीत उठलेले बुलबुल वादळ आज किनारी प्रदेशात धडकण्याची शक्यता आहे. हे वादळ ओडिशा कडून प.बंगाल आणि बांग्लादेशाकडे सरकत आहे. हे वादळ आज रौद्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने प.बंगालचा पूर्व मेदिनीपूर : २४, उत्तर २४ परगणा या भागात ९ ते ११ नोव्हेंबर पर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली.

या अंदाजानुसार,ओडीशाच्या किनारी भागात ताशी ५० किमी वेगाने वारे वाहतील आणि हा वेग पुढे वाढत जाईल. या संदर्भात हवामान खात्याचे महानिर्देशक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वादळाच्या प्रवासावर नीट लक्ष ठेवले जात असून त्याची दिशा आणि ते कुठे शमणार हे पाहात आहोत. ज्याभागात जास्त नुकसान होणार आहे तेथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी दल सज्ज आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा