विजापूर : छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात गुरुवारी नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान हुतात्मा झाला,असे पोलिसांनी सांगितले. या चकमकीत काही माओवादी ठार झाल्याची शक्यता असून सुरक्षा दले या परिसरामध्ये शोध घेत आहेत.

ही चकमक पामेड परिसरामध्ये सीआरपीएफ व राज्य पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली असता पहाटे उडाली,असे उपमहानिरीक्षक (नक्षलविरोधी कारवाई) सुंजरराज पी. यांनी सांगितले. या चकमकीत सीआरपीएफच्या १५१व्या बटालियनचे कॉन्स्टेबल कामता प्रसाद गोळी लागल्याने जखमी झाले. त्यांना तेलंगणमधील रुग्णालयात नेताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला.

जेरापल्ली गावजवळच्या जंगलास गस्ती पथकावर नक्षलवाद्यांच्या एका गटाने गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा