मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष आता टोकाला गेला आहे. शिवसेना आणि भाजप नक्की काय निर्णय घेणार सगळ्या राज्याचं लक्ष आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. आपल्या आक्रमक भाषणात उद्धव यांनी, ‘आपल्या पक्षाचं निर्माण स्वाभिमानातून झालं आहे. केवळ भाजपची कोंडी करायची म्हणून आपण हे सगळं करत नाही. मला युती तोडायची नाही, त्यामुळे भाजपने काय तो निर्णय घ्यावा’ अशी भूमिका घेतली आहे.

वाचा : फडणवीसांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री

‘लोकसभेदरम्यान जे ठरलं होतं ते मान्य करण्यास भाजपा तयार झाली असती तर आपण चर्चेस तयार होतो. मला ठरल्यापेक्षा एक कणही जास्त नको. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यास तयार असतील, तर भाजप पक्षश्रेष्ठींनी आम्हाला फोन करावा अथवा करु नये,’ असंही उद्धव बैठकीतल्या आपल्या भाषणात म्हणाले.

तर फडणवीसांनी शिवसेनेत प्रवेश करुन मुख्यमंत्री व्हावं : बच्चू कडू

आमदारांच्या बैठकीनंतर शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला.

शिवसेनेकडे आणखी वेगळे पर्याय आहेत : राऊत

भाजपने संख्याबळाशिवाय सत्ता स्थापन करणं धोकादायक

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा