सोशल मीडियामधील सर्वाधिक प्रभावी माध्यमांपैकी एक ट्विटरमध्ये आता काही महत्त्वाचे बदल होणार आहे. ही कंपनी पुढील वर्षापासून ट्विट आणि रिट्विटच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या विचारात आहे. ट्विटरचे उपाध्यक्ष डेंटली डेव्हिस (डिझाइन अँड रिसर्च ) यांनी या संदर्भात माहिती दिली. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर लवकरच एक छळवणूक विरोधी फीचर (Anti-Harassment Features) आणण्याची शक्यता आहे.

डेंटली डेव्हिस यांनी २०२० मध्ये ज्या फीचर्समध्ये बदल किंवा जे नवे फीचर्स आणायचा विचार आहे,याची एक यादी शेअर केली.तसेच, त्यांनी युजर्सकडून शिफारसी देखील मागवल्या आहेत. यानुसार, युजरला आणखी चांगल्या प्रकारे ट्विटर वापरता यावे यासाठी युजरच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही त्यांच्या संवादाचा भाग बनू शकणार नाहीत. युजर्स लवकरच स्वत: ठरवू शकतात की इतर युजर्स त्यांचे ट्विट रिट्वीट करु शकतात किंवा नाही, किंवा एखाद्या खास ट्विटला रिट्विट करण्याचा पर्याय बंद करणे. याशिवाय परवानगीशिवाय मेंन्शन करता न येणे,अशा प्रकारच्या फीचरबाबत कंपनी विचार करत आहे.हे फिचर लाँच झाल्यावर ट्विटरवर रिट्विट आणि दुसऱ्या युजर्सना मेंन्शन करण्याची पद्धत पूर्णपणे बदणार आहे. या फीचरनंतर कोणत्याही कन्व्हर्सेशनमध्ये युजरच्या परवानगी शिवाय कोणीही त्यांना सामील करु शकणार नाही. यापूर्वीच ट्विटरने राजकीय जाहिराती ट्विटरवरुन बंद करण्याची घोषणा केली होती.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा