बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असला तर हे वृत्त जरूर वाचा. इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन अर्थात आयबीपीएसने (IBPS)विशेष अधिकारी (स्पेशलिस्ट ऑफिसर, SO)पदाच्या एकूण १,१६३ जागांसाठी भरती जाहीर केलीये. यामध्ये, कृषी क्षेत्र अधिकारी(स्केल- I), आयटी अधिकारी (स्केल- I),कायदा अधिकारी (स्केल- I), राजभाषा अधिकारी (स्केल- I), मार्केटिंग ऑफिसर (स्केल- I),आणि मनुष्यबळ / वैयक्तिक अधिकारी (स्केल- I) या पदांचा समावेश आहे.

यासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेला ६ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली. २६ नोव्हेंबर अर्ज करण्याची अखेरचा दिवस आहे. आयबीपीएसच्या ibps.in या अधिकृत संकेतस्थळावरुन इच्छुकांना अर्ज करता येईल. स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत होणार आहे.

पहिल्या टप्प्यात २८ आणि २९ डिसेंबर रोजी पूर्व परीक्षा होईल. या परीक्षेचा निकाल जानेवारीत जाहीर होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मुख्य परीक्षा होईल. मुख्य परीक्षा २५ जानेवारी २०२० रोजी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. त्यानंतर अखेर फेब्रुवारी महिन्यामध्ये मुलाखत घेतली जाईल.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्याचं वय २० ते ३० च्या दरम्यान असावे. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. परिणामी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर (ibps.in)असेलेले नोटीफीकेशन पाहूनच अर्ज करावा.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा