मुंबई : ‘मुख्यमंत्री पदापेक्षा राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आधी शेतकऱ्यांकडे लक्ष द्या,’ अशी मागणी आमदार आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी केली आहे. ‘यांना शिवसैनिक समजा, त्यांना भाजप समजा अशी वक्तव्ये राजकारणात चालत नाहीत. तसे असेल तर देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश करावा आणि मुख्यमंत्री व्हावं’ असा टोलाही त्यांनी मुनगंटीवार आणि भाजपला लगावला.

वाचा : काय म्हणाले होते मुनगंटीवार

बच्चू कडू यांनी गुरुवारी सकाळी शिवसेना पक्षप्रमुख यांची भेट घेतली. राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सांगण्यासाठी आणि यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी ठाकरे यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना लवकर मदत न मिळाल्यास राजभवनावर मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.

सत्तास्थापनेबाबत बोलताना त्यांनी ‘आपण शिवसेनेला पाठिंबा दिला आहे त्यामुळे सेनेचाच मुख्यमंत्री व्हावा. जर ५०-५० फॉर्मुल्याबाबत भाजपने शब्द दिला असेल तर तो पाळावा. राजकारणात दिलेला शब्द पाळायला महत्त्व आहे,’ असे त्यांनी सांगितले.

वाचा : शिवसेनेकडे आणखी वेगळे पर्याय आहेत : राऊत

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा