मुंबई : सत्तास्थापनेसाठी भाजप सेनेतील संघर्ष अधिकच वाढलं आहे. सेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा पुनरुच्चार केला तर भाजप नेते व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिकच आहेत, खुद्द उद्धव ठाकरे यांनीच त्यांना शिवसैनिक म्हणले आहे. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने राज्याचा मुख्यमंत्री शिवसैनिकच होणार आहे’ असे वक्तव्य केले.

वाचा : महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री शिवसेनेचाच : राऊत

‘आम्ही राज्याला स्थिर सरकार देण्याच्या प्रयत्नात असून राज्यपाल कोश्यारी यांच्याशी सत्ता स्थापनेबाबतच्या घटनात्मक तरतुदींबाबत चर्चा करू. त्यानंतरच सरकार स्थापनेबाबत निर्णय घेऊ. काहीही झाले तरी नवे सरकार हे शिवसेनेला सोबत घेऊनच स्थापन केले जाईल. त्याच साठी आम्ही इतके दिवस थांबलो आहोत. राज्यपालांसोबत चर्चा झाल्यानंतर कोंडी फुटण्यास मदत होईल. आम्ही अल्पमतातील सरकार स्थापन करणार नाही, स्थिर सरकार स्थापनेसाठीच आम्ही शिवसेनेची वाट बघत आहोत. शिवसेना सोडून इतर पर्यायांचा आम्ही विचारही करत नाही,’ अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यात येतील ही शक्यताही त्यांनी फेटाळली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा