मुंबई : विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून १५ दिवस उलटले असले तरी राज्यातला सत्तास्थापनेचा तिढा अजून सुटला नाही. त्यातच आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ‘भाजपकडून आमच्या काही आमदारांना फोन येत आहेत. त्यांना प्रलोभन दाखवले जात आहे, असा धक्कादायक दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

जयंत पाटील म्हणतात, सत्तेचे गणित जुळवून आणण्यासाठी आमच्या काही आमदारांना भाजपकडून अमिषं दाखवली जात आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार फुटणार नाही. जितकी फुटाफूट व्हायची होती ती निवडणुकीच्या आधीच झाली आहे. जे निवडून आले आहेत ते सर्व नवे चेहरे आहेत. जनतेच्या विश्वासाला हे सर्वजण पात्र आहेत. ‘मी पुन्हा येईन’ असं म्हणणाऱ्यांना निकाल लागूनही सरकार बनवणे शक्य होत नाहीय. त्यामुळे आता आमदार फुटण्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र आता कोणत्याही पक्षातून आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला तर सर्व पक्ष एकत्र येऊन फुटणाऱ्या आमदाराला पराभूत करू. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. विरोधी पक्षात बसण्याची आमची मानसिकता आहे.

तर फडणवीसांनी शिवसेनेत प्रवेश करुन मुख्यमंत्री व्हावं : बच्चू कडू

विजय वडेट्टीवार म्हणतात, आमच्या काही आमदारांना भाजपकडून फोन आले आहेत. येत्या काळात ब्लॅकमेलिंग, धमकावणं हे प्रकारही होऊ शकतात अशी शक्यता गेली २५ वर्षे भाजपसोबत मैत्री असलेल्या शिवसेनेनेही व्यक्त केली आहे. भाजपचं फोडाफोडीचं राजकारण आता यशस्वी होणार नाही. काहीही झाले तरी महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार नाही. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने सत्तास्थापनेचा दावा करणे अपेक्षित आहे. मात्र तसे झाले नाही आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली तर त्याला भाजपच जबाबदार असेल.

वाचा : आमचे आमदार फोडण्याची हिंमत कुणाच्यातच नाही : राऊत

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा