मुंबई : राज्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारची मदत कधी मिळणार असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर मुंबईत पालकमंत्र्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राची वाट न पाहता आकस्मित निधीद्वारे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले.

मुनगंटीवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्र्यांच्या बैठक पार पडली. आपापल्या जिल्ह्यात अवकाळी पावसामळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यातील सर्व ३४ जिल्ह्यांतील एकूण ७० लाख हेक्टरवर अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यांपैकी १९ लाख हेक्टरवर कापूस, १८ लक्ष हेक्टरवर सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत ६० लाख हेक्टरचे पंचनामे झाले आहेत. पीक विम्याचे पैसे मिळताना शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत यावरही बैठकीत चर्चा झाली.

शेतकरी-शेतमजुरांना २ ते ३ रुपये दराने धान्य देणार
कोकणापासून पूर्व विदर्भापर्यंत शेतकरी व शेतमजुरांना २ ते ३ रुपये किलो दराने धान्य पुरवठा करण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे जी उभी पीकं जमीनदोस्त झाली अशा शेतीची सफाई मनरेगाच्या माध्यमातून करण्यात येईल. शेतकऱ्यांकडून बँकांनी सक्तीची कर्जवसूली करु नये असे आदेश बँकांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर चारा निर्मितीच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. खरीपाच्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याने रब्बीचे पीक मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे यावरही लक्ष ठेवण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.

राज्यातल्या स्थितीवर बोलण्यासारखं काही नाही : पवार

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा