मुंबई : राज्यातला सत्तासंघर्ष कधी संपणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नेत्यांच्या गाठीभेटी आणि बैठकींमुळे वेगवेगळ्या समीकरणांचे अंदाज बांधले जात आहेत. भाजपच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांच्या मागे संपूर्ण भाजप खंबीरपणे उभी असून, त्यांच्याच नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे, असा दावा केला.

सेनेच्या प्रस्तावासाठी दारे खुली
राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. शिवसेनेकडून अद्यापपर्यंत कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यांच्या प्रस्तावासाठी भाजपची दारे खुली आहेत, असं पाटील म्हणाले.

वाचा : कोणत्याही क्षणी गोड बातमी येईल : सुधीर मुनगंटीवार

वाचा : ‘मुख्यमंत्री फक्त सेनेचाच’ राऊतांचा पुनरुच्चार

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा