नवी दिल्ली : अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी वाद प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात दोन्ही पक्षांचे युक्तीवाद पूर्ण झाले. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून तो २३ दिवसानंतर म्हणजेच येत्या १७ नोव्हेंबरला दिला जाणार आहे. या खटल्याची सुनावणी तासभर आधीच पूर्ण झाली. त्यानंतर या संदर्भात १७ नोव्हेंबरला निर्णय सुनावणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयात आज राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणावर लागोपाठ ४० दिवस सुनावणी पूर्ण करण्यात आली. पाच सदस्यीय संविधानिक खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी पूर्ण केली.आज सुनावणी सुरू होताच मुख्य न्यायाधीश (सीजेआय) यांनी स्पष्ट केले की,आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत या प्रकरणाची अंतिम सुनावणी पूर्ण होईल. परंतु, ही सुनावणी वेळेपूर्वी तासभर आधीच पूर्ण केली.

आजच्या सुनावणीत मुस्लीम आणि हिंदू पक्षकाराने आपापली बाजू समोर मांडली. सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी दरम्यान मुस्लीम पक्षकाराचे वकील राजीव धवन यांनी हिंदू महासभेच्या वकिलाकडून सादर केलेला नकाशा फाडला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा