पुणे : एल्गार परिषद प्रकरणात पोलिसांना काही कागदपत्रात टोपण नावे मिळून आली. त्यानुसार पोलिसांनी कॉम्रेड मंगलू हे मिलिंद तेलतुंबडे, कॉम्रेड रोना हे रोना विल्सन असल्याचा अर्थ काढला, मात्र काही पत्रात कॉमेड प्रकाश आंबडेकर असा उल्लेख असूनही पोलिसांनी त्यांची चौकशी का केली नाही? असा सवाल बचाव पक्षाच्या वकील रोहन नहार यांनी याप्रकरणात अटक करण्यात आलेल्यांचा जामिनाच्या सुनावणी दरम्यान केला.

सत्र न्यायाधिक्ष एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात एल्गार परिषद प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांच्या जामिनावर सुनावणी सुरू आहे. वर वरा राव व रोना विल्सन यांच्या वतीने रोहन नहार यांनी बाजु मांडली.

नहार म्हणाले, तपासादरम्यान पोलिसांनी अनेक कागदपत्रे, पत्रे जप्त केली आहेत. त्यात पाठविणारा आणि ज्याला पाठविले ते दोन्हीही अनओळखी व्यक्ती आहेत. तपास अधिकार्‍याकडे अटक करण्यात आलेले आणि पत्रात टोपण नाव असणारे हेच आहेत हे स्पष्ट करणारा एकही पुरावा नाही. इंडियन असोसिएशन पिपल्स लॉयर्स (आयपीएल) ही सीपीआय (एम) ची फ्रंटल ऑरगनायझेन असल्याचे सांगतात मात्र त्यावर सरकाने बंदी घातलेली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शरण आलेल्या माओवाद्यांनी वर वरा राव हे माओवादी संघटनेशी संबंधीत असल्याचे सांगितले. तपासात हे गृहित धरता येणार नाही. त्यांच्यावर 27 गुन्हे दाखल करण्यात होत. परंतु एकही आरोप सरकारला सिद्ध करता आला नसल्याचे नहार यांनी सांगितले. एल्गार परिषदे मुळे दुसर्‍या दिवशी दंगल झाल्याचे पोलिस सांगत आहेत. मात्र त्यांनी याचा एकही पुरावा दिला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विल्सन व राव यांच्या विरोधात प्रथमदशर्नी पुरावा नसल्याचे नहार यांनी न्यायालयास सांगितले.

शोमा सेन यांची बाजु मांडतांना राहूल देशमुख म्हणाले, सेन यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तूमध्ये काहीही सापडले नाही. पोलिसांना चार पत्रे सापडली असून ती कोणी पाठविली आहे याचा उल्लेख नाही. सेन यांच्या नावाचा उल्लेख आहे. यात कुठलेही शस्त्र वापरल्याचा पुरावा नाही, असे देशमुख म्हणाले. तसेच एल्गार परिषदेतमुळे भिमा कोरेगाव येथे दंगल झाली असल्याचे सांगत असताना कोणाचेही म्हणणे नोंदवले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पुढील सुनावणी 17 ऑक्टोबरला होणार आहे. तर सुधा भारद्वाज, अरूण फरेरा, व्हर्नान गोन्सालविस यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा