जेष्ठ बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचा आज ६५वा वाढदिवस.सौंदर्य आणि कला यांचा अनोखा संगम म्हणजे रेखा!
सौंदर्य, अभिनय आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चे खास स्थान निर्माण केले. रेखा यांचे खरे नाव भानुरेखा गणेशन.पण, अजूनही हे नाव काही जणांना अपरिचित आहे. बेबी रेखा या नावाने त्यांनी प्रथम तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. १९८१ मध्ये आलेल्या मुजफ्फर अली निर्मित ‘उमराव जान’ने रेखा यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फटाकडी’ या मराठी चित्रपटामध्ये ‘कुठं कुठंठ जायाच हनिमुनला..’ या लावणीवर त्यांनी केलेले नृत्य प्रचंड लोकप्रिय झाले.

रेखा यांच्या लोकप्रिय चित्रपटातील आणि पुरस्कार सोहळ्यातील निवडक छायाचित्रे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा