पुणे : पदपथावर उभ्या केल्या दुचाकीवर दंडात्मक कारवाई केल्याच्या रागातुन महिला पोलिस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की केल्याचा प्रकार बिबवेवाडी येथे घडला आहे. याप्रकरणात एका 28 वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे.

विठ्ठल विष्णु धरपाळे असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय पोलिस नाईक महिलेने फिर्याद दिली आहे.

धरपाळे याने आपली दुचाकी बिबवेवाडी येथील शेर ए पंजाब हॉटेल समोरील पदपथावर लावली होती. यावर महिला पोलिस दंडात्मक कारवाई करत असताना धरपाळे याने धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा