नेटफ्लिक्स,अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ, हॉटस्टार, वूट यांसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच्या आगमनामुळे टीव्ही वाहिन्यांचे प्रेक्षक हळूहळू कमी होऊ लागला. परंतु ऑनलाईन प्लॅटफॉर्म जितके लोकप्रिय आहेत, तितकेच ते वादग्रस्त देखील आहेत. कुठल्याही प्रकारचे सेन्सॉरशीप नसल्याने या अ‍ॅपचा वापर समाजात मोठ्या प्रमाणावर धार्मिक असंतोष व अश्लिलता पसरवण्यासाठी केला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींवर ठोस उपाय शोधण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाने पुढाकार घेतला असून, या संदर्भात एक कार्यशाळा आयोजित केली.

ही कार्यशाळा येत्या १० आणि ११ ऑक्टोंबर रोजी होणार आहे. कार्यशाळेत माहिती व प्रसारण विभागातील सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.ही कार्यशाळा घेण्याची कल्पना माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची होती. मात्र, निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याने ते अनुपस्थित राहणार,” अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर कुठल्याही प्रकारची सेन्सॉरशीप नसल्यामुळे टीव्ही वाहिन्यांवर निर्बंध घातलेली सामग्री ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दाखवली जाते,असे आरोप वारंवार होतात. या आरोपांवर व त्यावरील उपायांवर मनोरंजन क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेमुळे नेटफ्लिक्स व अ‍ॅमेझॉनसारख्या ऑनलाईन अ‍ॅपमुळे सेन्सॉरशीप आली तर या मालिकांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या अश्लील दृष्य व भाषेवर मर्यादा येतील, असा तर्क लावला जात आहे. याआधीही अशाच प्रकारची एक कार्यशाळा मंत्री स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली गेली होती. परंतु या कार्यशाळेत कोणताही तोडगा सापडला नाही.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा