वॉशिंग्टन : सीरियाच्या उत्तरेकडील भागात तुर्कीच्या नियोजित कारवाईपूर्वी त्या भागातून सैन्य मागे घेण्याच्या आपल्या निर्णयाचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केले.अमेरिका म्हणजे पोलीस दल नाही आणि अमेरिका निरंतर युद्ध लढणार नाही,असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. मात्र ट्रम्प यांचा हा निर्णय कुर्द यांच्याशी प्रतारणा करणारा असल्याची टीका रिपब्लिकनांनी केली.

सीरियाच्या उत्तरेकडील सीमेवरून अमेरिकेचे सैन्य मागे घेण्यात येत असल्याची घोषणा व्हाइट हाऊसमधून करण्यात आल्यानंतर ट्रम्प यांनी वरील स्पष्टीकरण दिले.अमेरिकेच्या या निर्णयाचा परिणाम कुर्द एकाकी पडण्यावर होणार आहे, कारण आयसिसविरुद्धच्या लढ्यात कुर्द हा अमेरिकेचा मुख्य घटक आहे.

सीरियातून अमेरिकेचे सैन्य मागे घेण्याच्या आपल्या निर्णयामुळे अमेरिका रोमांचित झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.आम्हाला आमचे सैन्य मागे घ्यावयाचे आहे, आता खूप वर्षे झाली आहेत,अनेक दशके लोटली आहेत, त्यामुळे आम्हाला आमचे सैन्य माघारी घ्यावयाचे आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा