मुंबई : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात पाच टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेऊन दिवाळी भेट दिली असतानाच,या निर्णयाचा शेअर बाजारात चांगला परिणाम झालेला दिसतो. सेन्सेक्स आज ६४६ अंकांनी वधारला असून, ३८,१७८ अंकांवर बंद झाला. तर निफ्टीही १८७ अंकांची वाढ नोंदवून ११, ३१३वर स्थिरावला.

मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) ६४५.९७ अंकांनी वधारून ३८, १७७. ९५ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १८६.९० अंकांनी वधारून ११,३१३.३० अंकांवर स्थिरावला. बँकिंग आणि ऑटो क्षेत्रात चांगली वाढ झालेली दिसली. इंडसलँड बँक, भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा स्टील यांच्या समभागांमध्ये ५.७२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.
तत्पूर्वी, आठवड्याच्या व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात सुरुवातीला ढेपाळलेला होता.

केंद्र सरकार कडून ‘या’ कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा