नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले होते. त्यावर पहिल्यांदाच पक्षाचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी जाहीरपणे वक्तव्य केले.त्यांनी पक्षाच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली असून, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने पक्षावरील संकट आणखी वाढले आहे,असे ते म्हणाले.आमचे नेते सोडून गेले हीच आमची मोठी समस्या आहे,असे ही ते म्हणाले.काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राहुल गांधी यांनी जबाबदारीपासून पळ काढल्याची आतापर्यंत दबक्या आवाजात चर्चा होती. पण आता त्यावर पक्षाचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी उघडपणे वक्तव्य केले. सर्वात मोठी समस्या म्हणजे आमचे नेतेच आम्हाला सोडून गेले आहेत.राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने पक्षासमोरील संकटे वाढली आहेत,असे ते म्हणाले. राहुल गांधींच्या या निर्णयामुळे लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतरही पक्षाला आत्मपरीक्षण करता आलेले नाही. लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला याचे विश्लेषण करण्यासाठी आम्हाला अजूनही एकत्र येता आलेले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा