दसऱ्याच्या दिवशी फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमानांचे पूजन करण्यावरुन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याबाबत सोशल मीडियातून उलट-सुलट चर्चा सुरु आहे. विरोधकांनी देखील त्यांच्या या कृतीवर टीका केली.काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी राजनाथ यांच्या शस्त्र पूजनाला ‘तमाशा’ असे संबोधले आहे.

फ्रान्सकडून भारताला मिळणाऱ्या ३६ राफेल लढाऊ विमानांपैकी पहिले विमान भारतात आणण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दसऱ्याच्या दिवशी पॅऱिसला गेले होते. तिथे त्यांनी हिंदू संस्कृतीप्रमाणे या विमानाची विधीवत पुजा केली.विमानावर ओम चिन्ह काढत त्यावर फुलं अर्पण केली तसेच या विमानाला कोणाची नजर लागू नये म्हणून विमानाच्या चाकांखाली नारळ आणि लिंबू ठेवत पूजन केले.यावर मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अशा प्रकारच्या तमाशाची गरज नाही. जेव्हा आम्ही बोफोर्स तोफ भारतात आणली होती तेव्हा अशा प्रकारचा देखावा केला नव्हता,असे त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.तसेच राफेल विमानांच्या क्षमतांबाबत बोलताना ते म्हणाले, भारतीय हवाई दलाचे अधिकारी या विमानांचा वापर केल्यानंतर ठरवतील की ही विमाने चांगली आहेत की वाईट.

फ्रान्स बनावटीच्या ३६ राफेल विमानांपैकी पहिले विमान ज्याचा टेल नंबर RB-001 असा आहे ते मंगळवारी फ्रान्स सरकारने भारताकडे सुपूर्त केले. भारतीय हवाई दलाच्या वर्धापन दिनादिवशीच आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर ते भारताला मिळाले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा