नवी दिल्ली : रसायन विज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्काराची आज घोषणा झाली.अमेरिकेचे शास्त्रज्ञ जॉन बी. गुडइनफ, ब्रिटनचे स्टॅनली व्हिटिंघम आणि जपानचे शास्त्रज्ञ अकिरा योशिनो या तीन शास्त्रज्ञांना आयन बॅटरीच्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाला.स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सचे जनरल सेक्रेटरी अलॉन रॉयल यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

वैद्यकशास्त्रात भरीव कामगिरीसाठी सोमवारी तीन अमेरिकेतील शास्त्रज्ञांना नोबेल दिले. या पुरस्काराची घोषणा करताना रॉयल स्वीडिश अकादमीच ऑफ सायन्स यांनी म्हटले, कमी वजन, रिचार्ज करण्यासाठी पॉवरफुल बॅटरीचा वापर तसेच मोबाइल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी या बॅटरीचा वापर करता येतो.

फिजिक्ससाठी नोबेल पुरस्काराची घोषणा केली होती. यावर्षी फिजिक्ससाठी तीन शास्त्रज्ञांना संयुक्तपणे नोबेल पुरस्कार देण्यात आला. जेम्स पीबल्स यांना भौतिक ब्रम्हांड विज्ञानात सिद्धांत शोधण्यासाठी आणि मिशेल मेयर आणि डिडिएर क्वेलोज यांना सौरमंडळावर आणखी एक ग्रह शोधण्यासाठी संयुक्तपणे हा पुरस्कार जाहीर केला गेला.

नोबेल पुरस्कारांची घोषणा अशी होणार

सोमवारी, ७ ऑक्टोबर – वैद्यकशास्त्र
मंगळवार, ८ ऑक्टोबर – भौतिक शास्त्र
बुधवार, ९ ऑक्टोबर – रसायनशास्त्र
गुरुवार, १० ऑक्टोबर – साहित्य
शुक्रवार, ११ ऑक्टोबर – शांतता
सोमवार, १४ ऑक्टोबर – अर्थशास्त्र

वैद्यकशास्रातले नोबेल जाहीर

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा