जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्याचा आरोप असलेल्या नवीन दलाल याला शिवसेनेने उमेदवारी दिली. महाराष्ट्रा प्रमाणेच हरयाणामध्येही विधानसभा निवडणुका होणार असून या निवडणुकीमध्ये शिवसेनेने खालिदवर गोळीबार करण्याचा आरोप असणाऱ्या नवीनला तिकीट दिले आहे. हरयाणातील बहादुरगड मतदारसंघातून नवीन शिवसेनेच्या धुनष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे.

‘मी सहा महिन्यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला.राष्ट्रवाद आणि गौ संरक्षण हे माझे धोरण आहे,’असे स्वत:ला गौरक्षक म्हणावणारा नवीन सांगतो. ‘राष्ट्रवाद, गाईंचे संरक्षण आणि आपल्या क्रांतीकारांना ओळख मिळवून देण्यासाठी आमची लढाई आहे,’असे नवीनने एका खासगी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. भाजप आणि काँग्रेस सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न, हुतात्मा जवानांच्या कुटूंबियांची प्रश्न, गाई आणि गोरगरिबांबद्दल कोणताही आस्था नसून त्यांना केवळ राजकारण करायचे आहे अशी टीका नवीनने केली.नवीनला तिकीट दिल्याच्या वृत्तावर हणायातील दक्षिण विभागाचे शिवसेनेचे प्रमुख विक्रम यादव यांनी शिक्कामोर्तब केले.

दर्वेश सापूर आणि नवीन दलाल या दोघांनी १३ ऑगस्ट २०१८ रोजी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लब येथे उमर खालिदवर गोळीबार केला होता.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा