वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलीना जॉर्जिवा यांनी ९० टक्के जगाला मंदीचा सामना करावा लागणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. आपल्या पहिल्याच भाषणात बोलताना त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर दहा वर्षातील निचांकी पातळीला पोहोचण्याची शक्यता आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची गतीही मंदावली असून भारत, ब्राझीलसारख्या उदयोन्मुख बाजारपेठांना यावर्षी याची गडद झळ बसेल, असे मत क्रिस्टलीना यांनी व्यक्त केले आहे.

‘दोन वर्षांपूर्वीचा विचार केला तर तेव्हा जागतिक अर्थव्यवस्था प्रगतीपथावर होती. जीडीपीच्या अनुषंगाने ७५ टक्के जगाचा प्रवास विकासाच्या दिशेने सुरु होता. पण आता ९० टक्के जगाला मंदीचा सामना करावा लागू शकतो असा अंदाज आहे. अमेरिका, जर्मनी सारख्या प्रगत देशांमध्ये मोठया प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली आहे. भारत, ब्राझील या प्रगतशील देशांमध्ये मंदीचे परिणाम दिसून येत आहेत. यावर्षी ते अधिक ठळकपणे दिसून येतील,’ असं त्या आपल्या भाषणात म्हणाल्या.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा