पुणे : शहर व उपनगराला पावसाच्या जोरदार तडाख्याने झोडपले आहे. दुपारनंतरच आभाळात काळे ढग दाटून आले होते. संध्याकाळी ६.१५च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. २६ सप्टेंबरच्या पावसाच्या आठवणींमुळे नागरिकांनी लवकरात लवकर घर गाठण्यासाठी प्रयत्न सुरु केले. ठिकठिकाणच्या रस्त्यावर पाणी साचले होते.

प्रचारावर पाणी

अनेक उमेदवारांच्या नियोजित प्रचारावर पावसाने पाणी फिरवले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेलाही पावसाचा जोरदार फटका बसला. सभास्थळी चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा