नवी दिल्ली: केंद्र सरकारने देशातील पर्यावरणाच्या रक्षणासाठी, तसेच हरित क्षेत्राची वाढ करण्यासाठी १४०० किलोमीटर लांबीची ग्रीन वॉल तयार करण्याचा निर्णय घेतला.आफ्रिकेतील सेनेगल ते जिबूतीपर्यंत बनलेल्या हरित पट्ट्याच्या धर्तीवर गुजरात ते दिल्ली-हरयाना सीमेपर्यंत ही ‘ग्रीन वॉल ऑफ इंडिया’ विकसित होणार आहे. या वॉलची लांबी १४०० किलोमीटर, तर रुंदी ५ किलोमीटर असेल.

आफ्रिकेत वातावरण बदल आणि वाढत जाणारा वाळवंटी प्रदेश या समस्यांशी दोन करण्याच्या उद्देशाने हरित पट्टा तयार होणार आहे. या हरित पट्ट्याला ‘ग्रेट ग्रीन वॉल ऑफ सहारा’ असेही म्हटले जाते.

भारतात ग्रीन वॉल बनवण्याचा विचार प्राथमिक अवस्थेतआहे. परंतु, ग्रीन वॉल निर्मितीसाठी मंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. जर या प्रकल्पाला मंजुरी मिळाली, तर भारतातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी भविष्यात हा प्रकल्प एक उदाहरण म्हणून सिद्ध होईल. हा प्रकल्प थरच्या वाळवंटाच्या पूर्व बाजूला विकसित केला जाणार आहे.

पोरबंदर ते पानीपतपर्यंत बनणाऱ्या या हरित पट्ट्यामुळे घटणाऱ्या वन क्षेत्रात वाढ होणार आहे. या व्यतिरिक्त, गुजरात, राजस्थान, हरयाना ते दिल्लीपर्यंत पसरलेल्या अरवलीच्या पर्वतरांगांवरील घटत्या जंगलाची समस्या सोडवणे शक्य होईल.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा