मुंबई : देशात मंदीने घर केल्याचे वास्तव केंद्र सरकार सातत्याने नाकारत आले असले, तरी रिझर्व बँकेने वेळोवेळी सादर केलेली आकडेवारी आर्थिक मंदीचे पुरावे देणारी स्पष्ट होत आहे. रिझर्व बँकेने चालू आर्थिक वर्षात सादर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या सहा महिन्यांत व्यावसायिक क्षेत्रातील वित्तीय देवाणघेवाणीत मोठी घसरण (जवळपास 88 टक्के) झाल्याचे दिसून आले आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत बँकिंग आणि नॉन बँकिंग क्षेत्रातून व्यावसायिक क्षेत्रात जाणारा निधी 90,995 कोटी होता. गेल्या वर्षी याच कालावधीत 7 लाख 36 हजार 87 कोटींचा निधी बँकिंग आणि नॉन बँकिंग क्षेत्रातून व्यावसायिक क्षेत्रात हस्तांतर करण्यात आला होत. गेल्या वर्षी एप्रिलपासून सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत ’एनबीएफसीं’चा व्यावसायिक क्षेत्रात हस्तांतर होणारा निधी 41,200 कोटी होता. मात्र, यंदा व्यावसायिक क्षेत्रातून ’एनबीएफसीं’कडे जाणारा निधी 1.26 लाख कोटींवर पोहोचला आहे. बँकांकडून व्यावसायिक क्षेत्रात हस्तांतर होणारा ’नॉन फूड क्रेडिट फ्लो’ 1.65 लाख कोटींवरून 93 हजार कोटींपर्यंत घसरला आहे. मात्र, बिगर बँकिंग स्त्रोतांकडून फंडिंगमध्ये नऊपट वाढ झाली असून, हा आकडा 58,326 कोटींवर जाऊन पोहोचला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये गेल्या तिमाहीपासून घसरण नोंदविण्यात येत आहे. एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये आर्थिक विकासाचा दर पाच टक्क्यांच्याही खाली आल्याचे दिसून आले. हा गेल्या सहा वर्षांतील सर्वांत वाईट कामगिरी ठरली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा