दिवाळीनिमित्त केंद्र सरकारच्या सेवेत असणाऱ्या श्रेणी ‘ब’ आणि श्रेणी ‘क’ तसेच राजपत्रित नसलेल्या कर्मचाऱ्यांना (Non-Gazetted Staff) नॉन प्रॉडक्ट लिंक्ड बोनस (Non Product Linked Bonus) रुपात दिवाळी बोनस मिळणार आहे. केंद्र सरकारकडून याबाबत घोषणा झाली.केंद्र सरकारचे कर्मचारी असूनही नॉन प्रोडक्ट लिंक्ड बोनस (Non Product Linked Bonus) घेण्यासाठी पात्र नसलेल्या कर्मचाऱ्यांना हा दिवाळी बोनस मिळेल.

एका खासगी वाहिनीच्या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, चार ऑक्टोबर रोजीच केंद्र सरकारकडून याबाबत आदेश जारी झाला आहे. यानुसार केंद्र सरकारच्या सेवेत जे कर्मचारी ३१ मार्च २०१९ पर्यंत कार्यरत होते आणि २०१८-१९ दरम्यान ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवेचे सहा महिने पूर्ण झालेत अशांना बोनसचा लाभ मिळणार आहे.कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बोनसचा लाभ हा सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार मिळणार आहे.

बोनसच्या रुपात केंद्रीय कर्मचाऱ्यांना साधारण ३०.४ दिवसांचे अतिरिक्त वेतन मिळेल. यानुसार कर्मचाऱ्यांना ६९०० रुपयांचा बोनस मिळू शकतो. याशिवाय निमलष्करी दल आणि सैन्य दलातील कर्मचाऱ्यांना ७ हजार रुपयांचा बोनस मिळेल. या संदर्भात प्रयागराज येथील एजी ब्रदरहुड संस्थेचे माजी अध्यक्ष हरिशंकर तिवारी यांनी अधिक माहिती दिली आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस शेअर बाजारात झळाळी

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा