पुणे : मतदानावेळी ‘नोटा’ पर्यायाचा वापर करणे योग्य नाही, नोटा लोकशाहीसाठी घातक आहे. त्यापेक्षा मतदारांनी उपलब्ध उमेदवारांपैकी जो चांगला उमेदवार आहे त्याला मतदान करावे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री व कोथरुडचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी म्हणले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.

‘नोटा’ चा वापर करणे लोकशाहीमध्ये योग्य नाही. थोडंफार डावं-उजवं असू शकतं. एक उमेदवार आवडत नसेल, तर मग असलेल्या उमेदवारांपैकी बरा उमेदवार जो असेल त्याला मतदान करावे. उपलब्ध असणाऱ्यांपैकी एका चांगल्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. ‘नोटा’ लोकशाहीसाठी घातक आहे.

चंद्रकांत पाटलांच्या विरोधात मनसेला महाआघाडीचा हात

पाटील यांना कोथरुड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांना स्थानिकांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. त्यातच आघाडीने उमेदवार न उभा करता मनसे उमेदवार किशोर शिंदे यांना बळ दिलं आहे. काही दिवसांपूर्वी कोथरूडमध्ये ‘आमचं ठरलंय, १०० टक्के नोटा’ असे फलक लागले होते. या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

चंद्रकांत पाटलांच्या मेळाव्याकडे कोथरुडकरांची पाठ

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा