पुणे : विधानसभा निवडणूक तोंडावर आलेल्या असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची सभा कुठे घ्यायची याचे कोडे पडले होते. न्यू इंग्लिश स्कुल, रमणबाग व टिळक रोड या दोन्ही शाळांनी सभेसाठी मैदान देण्यास नकार दिला होता. अखेर मनसेला राज ठाकरेंच्या सभेसाठी जागा मिळाली असून येत्या ९ तारखेला शुक्रवार पेठेतील सरस्वती मंदिर संस्थेच्या मैदानात सभा होणार आहे.

सभेला मैदान मिळत नसल्याने टिळक चौकात सभा घेण्यास परवानगी देण्याची मागणी मनसेने केली होती व तिथे सभा घेण्याचा निर्धारही केला होता. आता मात्र सरस्वती मंदिर संस्थेच्या मैदानातच मनसेच्या प्रचाराचा नारळ फुटेल. मनसेने पुण्यात कसबा पेठ, कोथरूड व हडपसर मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा