सांगवी : पिंपरी-चिंचवडमध्ये टिक-टॉक व्हिडिओ पाहात उभा असलेल्या महाविद्यालयीन तरुणावर गोळीबाराची घटना घडली. यात तो सुदैवाने बचावला. विरोधातील व्यक्तीच्या सोबत असल्याच्या संशयावरून महाविद्यालयीन तरुणावर गोळीबार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन तरुणाने सांगवी पोलिसात फिर्याद दिली आहे.

रोशन सोळंकी आणि चैतन्य कदम असे गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांना शोध सांगवी पोलीस घेत आहेत.फिर्यादीवर देखील महाविद्यालयात मारामारी केल्याचा गुन्हा दाखल आहे तर यातील आरोपी रोशनवर तीन गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जुनी सांगवी येथील गंगोत्री निवास येथे शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी महाविद्यालयीन तरुण आणि त्याचा मित्र हे मोफत वाय-फायवर टिक-टॉक व्हिडिओ पाहत रस्त्यावर उभे होते.तेव्हा, रोशन आणि चैतन्य हे एकच दुचाकीवरून आले. फिर्यादी दिसल्यानंतर दुचाकी हळुवार घेत दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या रोशनने महाविद्यालयीन तरुणाच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या, केवळ नशीब बलवत्तर असल्याने यात तो बचावला.आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सांगवी पोलीस घेत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा