पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने पाठिंबा जाहिर केला आहे. त्यामुळे आता गेल्या काही दिवसापासून पाटील यांच्या उमेदवारीवरुन उठलेले वादळ शमण्याची शक्यता आहे.

पाटील यांची कोथरुड मतदारसंघामधून उमेदवारी घोषित झाल्यानंतर ब्राम्हण महासंघाने विरोध केला होता. ब्राम्हण महासंघाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. पाटील यांनी शनिवारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. ब्राम्हण समाजाच्या विविध मागण्या संदर्भात यावेळी सकारात्मक चर्चा केली.त्यामुळे आता महासंघाकडून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा जाहिर करण्यात आला आहे. महासंघाकडून पाठिंब्याचे पत्र जाहीर करण्यात आले.

चंद्रकांत पाटील यांना ब्राम्हण महासंघाचा पाठिंबा
- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा