पुणे : तासभर झालेल्या धुव्वादार पावसामुळे पुन्हा एकदा पुणेकरांच्या काळजाचा ठोका चुकवला. रस्त्यांना आलेले नाल्याचे स्वरूप, ठिकठिकाणी कोसळलेली झाडे, पाण्यात अडकलेली वाहने आणि काही भागात सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने पुणेकरांना नुकत्याच झालेल्या ढगफुटीची आठवण झाली. पावसाचा इतका वेग होता की सुरूवातीच्या अवघ्या 15 ते 20 मिनिटांत शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. चौकाचौकांत प्रचंड पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली. मध्य भागातील अनेक पार्किंगमध्येही पाणी साठल्याने वाहने काढणेही कठीण झाले होते.

आज दुपारी काय घडले?
दुपारी 3 वाजता आकाशात काळेकुट्ट ढग भरून आले. त्यानंतर अर्ध्या तासातच जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक पूर्णत: बंद झाली. काही वेळातच बहुतांश रस्त्यांवरून एक ते दोन फुट पाणी वाहण्यास सुरूवात झाली. शहरात अनेक ठिकाणी झाडेही कोसळली. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांवर झाड कोसळल्याने वाहनांचेही मोठे नुकसान झाले. रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहन चालवणे अशक्य झाले होते. शहर व उपनगरांमधल्या बहुतेक रस्त्यांवरुन पाणी वाहत होते.

जोरदार पावसामुळे साठलेले पाणी काढताना नागरिक

गेल्या आठवड्यातच शहरात पावसाने धुमाकूळ घातला होता. त्या पावसाची भीती लोकांच्या मनात असल्याने अनेकांची धावपळ झाली. त्या पावसात सुमारे 23 लोकांना जीव गमवावा लागला, तर पशुधनाचेही मोठे नुकसान झाले होते.

शुक्रवारी किती पाऊस पडला
सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत शिवाजीनगर परिसरात 43 मि.मी., पाषाण परिसरात 50.1 मि.मी., तर लोहगाव परिसरात 63.6 मि.मी. पावसाची नोंद झाली. अवघ्या अडीच तासात पावसाने पुणेकरांना चांगलाच झटका दिला.

हवामान खात्याचा अंदाज
शहर आणि परिसरात आणखी तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. त्यानंतर मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच असणार आहे. परतीचा पाऊसही अद्याप सुरू व्हायचा आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पुणेकरांना पावसाचा सामना करावा लागणार आहे. काल शहरात 32 अंश कमाल, तर 21.9 अंश कमाल तपमानाची नोंद झाली. काल सकाळपासूनच शहरात ऊन्हाचा चटका वाढला होता. त्यामुळे उकाडाही वाढला होता. दुपारनंतर मात्र जोरदार पाऊस पडला.

गेल्या बुधवारचा पाऊस :

पुण्यात का झाली ढगफुटी?
पाणी आलं, जाताना सगळं घर घेऊन गेलं..
संसार रस्त्यावर अन अश्रृ अनावर
कष्टाने उभी केलेली ‘कस्तुरी’ पाण्यात ; पहा व्हिडिओ
म्हणून चुकतात हवामान खात्याचे अंदाज

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा