भरत नाट्य संशोधन मंदीर आयोजित भरत करंडक स्पर्धेतील एकांकिकांची परीक्षणे

प्रेक्षकांचा प्रयोग

आत्ता पर्यंत अनेक एकांकिका गाजल्या, खूप चर्चेत आल्या त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे प्रेक्षक. अश्याच एका प्रेक्षकाची कहाणी या नाटकातून समोर येते.
एक प्रेक्षक नाटक बघितल्यावर त्यातील अभिनेत्याचा एवढा मोठा चाहता होतो की तो हळूहळू त्याचं आयुष्य जगू लागतो. सिद्धार्थ त्याच्या मित्रांना घेउन नाटक करायचं ठरवतो पण येणाऱ्या अडचणी आणि त्याचं ध्येय हा प्रवास रंगमंचावर पहाणे सुखद ठरते.

प्रेक्षकांचा प्रयोग एकांकिकेतील प्रसंग

पडदा वर जाताना सखाराम बाईंडर मधल्या एका प्रवेशाने नाटकाची सुरुवात होते आणि प्रेक्षकांना एक सुखद धक्का बसतो. भव्यदिव्य नेपथ्य आणि ते क्षणात बदलायची कसब या एकांकीकेची जमेची बाजू ठरली. सुरुवातीपासूनच अनेक पात्र रंगमंचावर दिसतात आणि एकमेकांना उत्तम प्रकारे साथ देतात. प्रत्येक नाटकाचा शेवट हा गोड नसतो हेही या एकांकिकने दाखवून दिले.
संघ : Zeal college of engineering and research
लेखक : अथर्व मुळे
दिग्दर्शक : आलोक बेचके

OBJECTION SUSTAINED

भारत – बांग्लादेश दरम्यान झालेल्या स्थलांतरावर ही एकांकिका भाष्य करते. स्थलांतरित लोकांना नाहक तुरुंगात डांबून त्यांच्यावर विविध कलमांतर्गत
गुन्हा दाखल केला जातो. इतर फाईल्स बंद करून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला जातो. आणि ह्यात निर्दोष लोक आणि त्यांचे परिवार होरपळून निघतात. निव्वळ एका घटनेमुळे त्यांच्या अखंड आयुष्याला कलंक लागतो. आरोपी सिद्ध करण्याच्या नादात ती व्यक्ती भारतीय असताना देखील बांगलादेशी बनवण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या समाजाला, व्यवस्थेला हे कुणी समजून सांगावं असा सवाल ही एकांकिका करते

OBJECTION SUSTAINED एकांकिकेतील प्रसंग

आत्तापर्यंतच्या सर्व संघातील हा सर्वात शिस्तबद्ध संघ होता असे म्हणावे लागेल. त्यासाठी त्यांची विद्यार्थि प्रतिनिधी समृध्दी सुमारे हीचे कौतुक. देशाच्या एका कोपऱ्यात घडणाऱ्या घटनांवर अतिशय परखडपणे भाष्य केले गेले. लेखन आणि दिग्दर्शनाला अभिनयाची साथ मिळाली असती तर एकांकिका एका वेगळ्या उंचीवर गेली असती. वकिलांच्या भूमिकेत असणारा गौरव खाजेकर आणि आकांक्षा बिरारी भाव खाऊन गेले.
संघ : COEP, पुणे
लेखिका : नीलम निकम
दिग्दर्शक: पुष्पक पाटील

शोध

ताटातूट झालेल्या बाप आणि मुलाची गोष्ट इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स च्या ‘शोध’ या एकांकिकेत दिसते. अनिरुद्ध आणि अदिती विठ्ठल मंदिराचा व विठ्ठलाचा अभ्यास करायला येतात. प्रवासात वेळोवेळी विठ्ठल त्यांना मदत करत असतो.

शोध एकांकिकेतील प्रसंग

अनिरुद्धचे बाबा तो लहान असताना विठ्ठलामुळे निघून जातात. तो रिसर्चला येतो तेव्हा त्याच्या विठ्ठलाकडून अपेक्षा असतात की विठ्ठलाने त्याच्या बाबांना घरी पाठवावे. त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून विठ्ठल असल्याचे तो मान्य करत नाही. बाबा त्याला भेटतात का? विठ्ठल नेमका काय आहे? या प्रश्नांची उत्तरं या एकांकिकेतून मिळतात.
एकांकिकेची प्रकाशयोजना आणि संगीत संयोजन ही या एकांकिकेची जमेची बाजू ठरली. दिग्दर्शनही उत्कृष्ट होते.
संघ : इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स
लेखक : तृप्ती चौधरी, शुभम लोहार
दिग्दर्शक : सुरेश गंगाराम

Hidden tyrant

जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक प्रवाह निर्माण करणारे आणि दुसरे प्रवाहात वाहत जाणारे. Hidden Tyrant या नाटकात अशाच दोन प्रकारच्या मानसिकतेचा आढावा घेत भारताची सध्याची सामाजिक परिस्थिती आणि इतिहास यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे.

Hidden tyrant एकांकिकेतील प्रसंग

उत्कृष्ट दिग्दर्शनाला अभिनयाची जोड मिळाली आहे. प्रतिक कडलक याने सर्वोत्तम अभिनय केला आहे. प्रकाशयोजनेमुळे हिटलरचा काळ जिवंत केला आहे. वेशभूषेवर विशेष प्रयत्न केले असते तर एकांकिका आणखी दर्जेदार झाली असती.
संघ : नवरसम नाट्यसंस्था, पुणे
लेखक: अशोक खराटे आणि प्रतिभा ठिकपुरले
दिग्दर्शक : प्रतिभा ठिकपुरले

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा