पुणे : खडकवासला मतदारसंघात महायुतीत बंडखोरी करणार रमेश कोंडे यांच्या उमेदवारीला आता वेगळेच वळण आले आहे. शिवबंधन तोडून हातात घड्याळ बांधणार असल्याची चर्चा मतदारसंघात आहे. त्याचबरोबर मनसेचे वरिष्ठ नेतेही कोंडेंच्या संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले. गुरुवारी कोंडेंनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. परंतु त्यांना पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त झाला नसल्याने उमेदवारी अर्ज बादच होणार असून हा शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

एका बाजूला कोंडे यांच्या संपर्कात मनसे असतानाच दुरीकडे राष्ट्रवादी देखील त्यांना घड्याळ घालण्यासाठी उत्सुक आहे. त्याचा प्रत्यय गुरुवारी राष्ट्रवादीकडून मतदारसंघासाठी एबी फॉर्म दिलेले उमेदवार सचिन दोडके जेव्हा अर्ज न भरता माघारी निघून गेले तेव्हा राष्ट्रवादीतर्फेही कोंडे यांची चाचपणी केली जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे कोंडे हातातील शिवबंधन काढून हातात घड्याळ घालणार की रेल्वे इंजीनमध्ये बसणार हे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा