चुकीच्या अंदाजासह पावसाची आकडेवारीही चुकीची

पुणे : हवामान विभागाला हवामानाचा अचूक अंदाज कधीच आला नाही,हा इतिहास आहे. हवामान विभागाच्या वारंवार आलेल्या अनुभवातून पुणेकरांना हा इतिहास माहिती आहे.

शहरात बुधवारी रात्री ढगफुटी झाली.निम्मे शहर जलमय झाले. मध्यरात्री पाऊस थांबला, तरी गुरूवारी सकाळपर्यंत रस्त्यांवरून पाणी वाहत होते. इतकी भयानक परिस्थिती उद्भवली असतानाही पुणे वेधशाळा शहरात केवळ ५६.३ मि.मी. पाऊस पडला असल्याचे सांगत आहे. हवामान विभागाच्या सावळ्या गोंधळावर पुणेकरांंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार लोक खबरदारी घेतात.मात्र बुधवारी शहर आणि परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला होता. मात्र वास्तवात शहरात अक्षरश: ढगफुटी झाली. वाहने, घरांचे अतोनात नुकसान झाले. तरी शहरात नेमका किती पाऊस पडला. त्याची आकडेवारी काय? हे सांगण्याचा मोठेपणासुद्धा काल पुणे वेधशाळेकडून दर्शवला नाही. वेधशाळेच्या निष्काळजीपणाचा फटका मात्र पुणेकरांना सहन करावा लागला.

शहरात बुधवारी रात्री सुमारे १०० ते १५० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मात्र खरे आकडे वेधशाळेकडून जाहीर केलेले नाहीत.वेधशाळेने मुसळधार अथवा ढगफुटीचा इशारा दिला असता,तर लोकांनी खबरदारी घेतली असती. लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले नसते. तेरा जणांना आपला जीव गमवावा लागला नसता, वाहने वाहून गेली नसती. पशुधनाचे नुकसान टाळता आले असते. जीव मुठीत घेऊन रात्र काढावी लागली नसती. महापालिका व जिल्हा प्रशासन दक्ष राहिले असते.पुणे वेधशाळा आणि हवामान विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे पुणेकरांना मात्र प्रचंड नुकसान झाले.

संकेतस्थळावर जुनीच माहिती
शहरात बुधवारी रात्री ढग फुटी झाली, तरी गुरूवारी दुपारी ४ वाजेपर्यंत पुणे वेधशाळेने संकेतस्थळावर माहिती अद्ययावत दिली नव्हती. बुधवार दुपारपर्यंत मंगळवारी झालेल्या पावसाची माहिती संकेत स्थळावर होती.तसेच हवामान विभागाच्या मुख्य पानावरही शहरात केवळ ५६.३ मि.मी. पाऊस पडला असल्याचे नमूद केले होते.शहरासह संपूर्ण राज्यभरातील माहितीही जुनीच होती.या प्रकारामुळे लोकांच्या भावना आणखी तीव्र झाल्या.

वेध शाळेचे फोनही बंद
शहरात धुव्वाधार पाऊस कोसळताना पुणे वेधशाळेच्या कार्यालयातील फोन मात्र बंद होते. पावसाला सुरूवात होण्याआधी फोन सुरू होते. पावसाला सुरूवात झाली की, फोन बंद झाले. त्यामुळे पावसाचा अंदाज अथवा माहिती घेऊ पाहणार्‍या लोकांना फोन बंदमुळे माहिती मिळू शकली नाही.प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनीही पावसाची माहिती घेण्यासाठी बुधवारी रात्री वेधशाळेच्या कार्यालयात वारंवार फोन केले मात्र त्यांनाही फोन बंदमुळे माहिती मिळाली नाही.

पुण्यात पावसाचे थैमान; नऊ जणांचा मृत्यू

पुण्यात का झाली ढगफुटी?

पुण्यात हाहा:कार

गंगामाई गेली घरट्यात राहुनी…. (फोटो फिचर)

सदाशिव पेठेत पाणीच पाणी

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा