मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक बड्या नेत्यांवर शिखर बँक घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी निदर्शने केली. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहे. निवडणूक प्रचारासाठी मुंबई बाहेर असेल, त्यामुळे मी स्वतः २७ सप्टेंबरला मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर होईल. त्यांचा पाहुणचार स्वीकारण्याची माझी तयारी आहे, असं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यांत माझंही नाव आहे. माझ्या आयुष्यातील हे दुसरे प्रकरण आहे. ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे हे काल संध्याकाळी समजले. ईडीला मला काही प्रेमाचा संदेश पाठवायचा असेल आणि प्रचारामुळे मी उपलब्ध नसेन किंवा कोणत्या अदृश्य ठिकाणी गेलो तर; त्यामुळे त्याआधीच २७ सप्टेंबरला दुपारी दोन वाजता मी स्वतः मुंबईतील ईडीच्या कार्यालयात जाणार आहे. अधिकाऱ्यांना माझ्याकडून जी माहिती हवी आहे ती मी देईन. त्यांना जो काही पाहुणचार करायचा असेल तो स्वीकारण्याचीही माझी तयारी आहे. ईडीला सहकार्य करण्यासाठी माझे हात सदैव तत्पर असतील. आपण महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या तत्वांचे अनुसरण करतो त्यामुळे दिल्लीच्या तख्तासमोर वाकणार नाही. हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग नाही, असं पवार म्हणाले.

वाचा : शरद पवार, अजित पवारांसह 70 जणांवर इडीकडून गुन्हा पवारांवर गुन्हा; बारामती बंद, पुणे, मुंबईत निदर्शने

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा