भोर, प्रतिनिधी : पुणे-सातारा महामार्गावरील वेळू गावच्या हद्दीतल्या कंपनीत बॉयलरचा स्फोट होउन दोन कामगार सुमारे अडीचशे फूट अंतरावर उडून पडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सी.पी.एच. मॅन्युफॅक्चरींग एल.एल.पी.या कंपनीत ही दुर्घटना घडली. मॅनेजर रजिंदर प्रसाद व विकाससिंग हे या दुर्घटनेत ठार झाले. स्फोटाचे निश्चित कारण समजलेले नाही.

कंपनीची सुमारे तीस फूट उंचीची ही शेड होती. तिथे टायरपासून फर्निश ऑईल तयार केले जाते. बुधवारी सकाळी दोन कामगार शेडच्या वरच्या भागात लोखंडी पाईपला वेल्डींंग करत होते. त्याचवेळी शेजारी सुरू असलेल्या बॉयलरचा मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे शेडच्या छप्पराचे पत्रे फाटून दूर जाउन पडले तर दोन्ही कामगारही उडून सुमारे अडीचशे फूट अंतरावर जाउन पडले.
खाली काम करत असलेले दहा ते बारा कामगार कंपनीच्या बाहेर पळाल्याने मोठी दुर्घटना टळल्याची माहिती स्थानिकांनी दिली. अकरा वाजता स्फोटामुळे लागलेली आग दुपारी एक वाजता आटोक्यात आली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा