अहमदनगर : शहापूर येथील आदिवाशांनी काढलेला मोर्चा पोलिसांनी रोखला. ठाकर आदिवासी समाजातील १२ कुटुंबांच्या जमिनी खोटा दाखला देऊन हडप केल्याप्रकरणी माजी मंत्री मधुकर पिचड व त्यांच्या पत्नी कमल यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपातील गुन्हा दाखल करावा. अन्यथा शेकडो आदिवासी २२ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरु करतील, असा इशारा आदिवासींचे नेते अशोक भांगरे यांनी दिला.

या मागणीसाठी शहापूर तहसील कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा भरबाजारपेठेत पोलिसांनी रोखला. त्यावेळी पोलीस व आंदोलकात बाचाबाची होऊन शाब्दिक चकमक उडाली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा