पाकचा थयथयाट सुरूच

मुझ्झफराबाद : भारत सरकारने काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट सुरूच आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी आम्ही भारतासोबत युद्धासाठी सज्ज असल्याची दर्पोक्ती केली आहे. आज पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणात ते बोलत होते.

‘भारत स्वतंत्र काश्मीरमध्ये कुरापती करणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. भारताने तशी चुक केल्यास पाकिस्तान जोरदार प्रत्युत्तर देईल, आम्ही काश्मीरसाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ.’ असे वक्तव्य इमरान यांनी केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा