कोल्हापूर :अभिनेते नाना पाटेकर यांनी पूरग्रस्तांना कोल्हापूर येथे काळजी करु नका सगळे काही नीट होणार आहे असे आश्वासन दिले. ते आज कोल्हापुरातल्या शिरोळमध्ये भेट दिली. शिरोळमध्ये ५०० घरे बांधणार असल्याचे नाना पाटेकर यांनी सांगितले.शासनाने काही निधी दिला आहे. बाकीचे पैसे आम्ही देतो. मला यासाठी कोणतेही श्रेय नको जे काही करतोय ते आपण सगळे करतो आहोत असेही नाना पाटेकर यांनी स्पष्ट केले.

नाना पाटेकर यांनी काही पूरग्रस्तांची भेट पद्माराजे विद्यालयात घेतली.काळजी करु नका आपण सगळे एकत्र आहोत सगळे काही नीट होणार असे आश्वासन नाना पाटेकर यांनी पूरग्रस्तांना दिले.

नाम, नाना पाटेकर, मकरंद असे आम्हाला श्रेय लाटायचे नाही. प्रत्येकाने आपला वाटा उचलायाचा आहे, आत्ताही अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत.खूप चांगल्या पद्धतीने मदतकार्य सुरु आहे. मी मदत करणार म्हणजे काय? तर मीदेखील झोळी घेऊन लोकांकडेच पैसे मागणार लोक देतात त्यांना विश्वास वाटतो. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने मदतकार्य सुरु केले आहे. जिथे जिथे कमतरता भासेल तिथे आम्ही उभे राहतोच आहोत असेही नाना पाटेकर यांनी म्हटले.

नाना पाटेकर यांनी शिरोळ नंतर कोल्हापूर शहर तसेच सांगली येथे जाणार असल्याचे सांगितले. पाटेकर यांनी कोल्हापूर पूरग्रस्तांना भेटून त्यांना धीर दिला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा