क्वालालंपूर : वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या जीवाला भारतात धोका असल्याचे सांगत तो मलेशियातच राहिल, असे मलेशियाचे पंतप्रधान महातिर बिन मोहम्मद यांनी स्पष्ट केले. मलेशियातील हिंदूंवर आरोप केल्यानंतर नाईकच्या प्रत्यार्पणाबाबत मलेशियातील एका मंत्र्यांने मंत्रीमंडळाच्या बैठकीत आवाज उठवला होता, यावर तिथल्या पंतप्रधानांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या संदर्भात आंतराष्ट्रीय संकेतस्थळाने माहिती दिली.

“मलेशियात राहणारे हिंदू मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांच्यापेक्षा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती अधिक प्रामाणिक आहेत”‘,असा आरोप सध्या मलेशियात वास्तव्यास असलेल्या झाकिर नाईकने केला होता.यावर मलेशियाचे मनुष्यबळ विकास मंत्री एम. कुलसेगरन यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत आवाज उठवला.त्यांनी म्हटले की,“झाकिर नाईकला मलेशियातील अंतर्गत बाबींवर टीका करण्याचा किंवा स्थानिक समुदयांबाबत बोलण्याचा काहीही अधिकार नाही. नाईक बाहेरुन आलेला फरार माणूस असून त्याला मलेशियाच्या इतिहासाची खूपच कमी माहिती आहे. त्यामुळे त्याला अशा प्रकारे स्थानिक लोकांना अपमानीत करण्याचा विशेषाधिकार देता कामा नये.”

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा