नवी दिल्ली: दिल्लीतील आम आदमी सरकारने काही दिवसापूर्वी मोफत इंटरनेट आणि विजेच्या बिलाबाबत सूट देण्याची घोषणा केली होती. आता या यादीत आणखी एक मोठी घोषणा केली.यामध्ये त्यांनी रिक्षा फिटनेस शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला.तसेच या निर्णयाने दिल्लीतील रिक्षा चालकांना चांगलाच फायदा होणार आहे.

या व्यतिरिक्त रिक्षाचे नोंदणी शुल्क देखील आता निम्म्याने कमी केले आहे.या पूर्वी रिक्षा नोंदणीसाठी एक हजार रुपये मोजावे लागायचे, परंतु आता ही रक्कम केवळ ३०० रुपये केले आहे. दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिम कार्ड फी,जीपीएस शुल्कही माफ केले गेले.

या योजनेतून रिक्षा चालकांना खुश करण्यचा प्रयत्न सरकारचा प्रयत्न दिसतो. मात्र आम्ही निवडणुकांच्या जाहीरनाम्यात केलेल्या घोषणांची पूर्तता करत आहोत. त्यामुळे निवडणुकांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन असे काहीही नसल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

दिल्लीतील रिक्षा चालकांसाठी केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय
- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा