२०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये महिला टी-२० क्रिकेटच्या समावेश निश्चित होत आहे. या संदर्भातील माहितीला आयसीसीने दुजोरा दिला. यामुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये २४ वर्षांनी क्रिकेटचा समावेश होत आहे. या पूर्वी १९९८मध्ये झालेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिका विजेता होता.

आयसीसीने काही महिन्यांपूर्वी महिला टी-२० क्रिकेटचा बर्मिंगहॅम राष्ट्रकुल खेळांमध्ये सहभाग व्हावा यासाठी अर्ज दाखल केला होता. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसीने हे पाऊल उचलले होते.राष्ट्रकुल क्रीडा परिषदेने आयसीसीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर क्रिकेटचा २०२२ राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये अधिकृतरित्या समावेश केला आहे.आयसीसीनेही राष्ट्रकुल क्रीडा परिषदेच्या निर्णयाचे स्वागत केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा