येरवडा : पोलिस उपायुक्त परिमंडळ चारच्यासमोरून एका व्यक्तीच्या पिशवीतले रोख 29 लाख रूपये अज्ञात चोरट्याने पिशवीसह पळवून नेल्याची घटना घडली आहे. येरवड्यातील मशिद भागात भरदिवसा ही घटना घडली.

येरवडा येथील गुंजन चौकात पोलिस उपायुक्त परिमंडळ चार कार्यालय आहे. कुरिअरचे काम करणारे विठ्ठल करंजीकर खाजगी बसद्वारे नांदेड वरून मुंबईला जात होते. करंजीकर येरवडा येथे लघुशंकेसाठी उतरले. त्या दरम्यान त्यांनी पैशांनी भरलेली पिशवी खाली ठेवली होती. अज्ञात चोरट्याने अचानक येऊन रोख 29 लाख 24 हजार 650 रूपये असलेली पिशवी पळवून नेली.

या प्रकरणी येरवडा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. भरदिवसा पोलिस कार्यालयासमोरच चोरी झाल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडली आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे मंगेश भांगे करत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा