पुणे: शहरामध्ये येणार्‍या विविध उत्सवांच्या काळात नियमानुसार स्पीकर्सचा वापर करण्याचा निर्णय पुणे साऊंड ऍन्ड इलेक्ट्रिकल्स जनरेटर्स असोसिएशनच्या बैठकीत सर्वसंमतीने घेण्यात आला.

यावेळी सदस्यांनी केलेल्या भाषणात विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले. न्यायालयाच्या नियमाचे सर्व सदस्य पालन करतील. आगामी उत्सवांमध्ये सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकार्‍यांसोबत नियमांचे काटेकोरपणे पालन करून शहरातील उत्सव अधिक चांगला कसा होईल, या संबंधी काळजी घेतली जाईल. नागरिक तसेच पोलिस प्रशासनासोबत चांगला समन्वय राखून राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील सगळे उत्सव व्यवस्थित पार पाडले जातील. यावर एकमत झाले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा