मुंबईः शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. एचडीएफसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि आयटीसी यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी पडझड झाली. दुपारी तीन पर्यंत सेन्सेक्स ६०० अंकांच्या घसरणीसह ३७ हजारांच्या खाली आला. तर निफ्टी १७६ अंकांच्या घसरणीसह ११ हजारांच्या खाली आला.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा ३० शेअरचा सेन्सेक्स १७३ अंकांने उसळून तो ३७ हजार ७५५ अंकांवर उघडला. येस बँकेचे शेअर ५२ आठवड्याच्या खाली घसरले. तर दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या शेअर्सने या दशकातील सर्वात मोठी उसळी घेतली. रिलायन्स इंडस्ट्रीजवरील सर्व कर्जे १८ महिन्यांच्या कालावधीत फेडली जातील,अशी महत्त्वपूर्ण घोषणा या कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सोमवारी येथे केली,रिलायन्सच्या जिओ फायबरची सुरुवात पुढील महिन्यात होणार असल्याची मोठी घोषणा केल्याने या सर्वांचा फायदा रिलायन्सला झाला. त्यामुळे आज बाजार उघडताच रिलायन्सचे शेअर वधारले.

सोमवारी बकरी ईद असल्याने देशातील प्रमुख शेअर बाजार बंद होते.सेन्सेक्स शुक्रवारी २५४ अंकांच्या उसळीसह ३७ हजार ५८१ अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी ७७ अंकांच्या झेपेसह ११ हजार १०९ अंकांवर बंद झाला होता.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा