दुरूस्तीकामात पावसाचा व्यत्यय

पुणे : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने लोणावळा ते कर्जत दरम्यान दुरूस्ती व विकाम कामांना सुरूवात केली आहे. मात्र पावसामुळे हाती घेण्यात आलेले काम पूर्ण होण्यास व्यत्यय येत आहे. याच कारणामुळे या कामाचा कालावधी वाढणार असल्याने पुणे-मुंबई दरम्यान धावणार्‍या गाड्या सुरू होण्यास विलंब होणार आहे. परिणामी प्रवाशांना गाड्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

येत्या 16 ऑगस्ट रोजी पुणे-मुंबई मार्गावरील रद्द करण्यात आलेल्या गाड्या सुरू करणार असल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली होती. मात्र गाड्या सुरू होण्यास 18 किंवा 19 ऑगस्टची वाट पहावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. तोपर्यंत रेल्वे प्रवाशांना मात्र रोजच गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. तसेच पुणे-मुंबई प्रवासासाठी अधिकचे पैसेही मोजावे लागणार आहेत. पाऊस थांबला तर हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण होऊ शकते. अन्यथा त्यास विलंब होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा