इस्लामाबाद : जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० भारताने रद्द केल्यानंतर पाकिस्तानने सर्वच स्तरावर भारताला घेरण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. परंतु प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानला तोंडघाशी पडले. आता पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनीदेखील पाकिस्तानला कोणाची साथ मिळत नसल्याची अप्रत्यक्षरित्या कबुली दिली. संयुक्त राष्ट्रातही कोणी आपल्या बाजूने उभा नसून आता मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचे ते म्हणाले.

“संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत कोणत्याही देशाचे समर्थन मिळणे कठिण आहे.मुर्खांच्या स्वर्गात आपण राहू नये. पाकिस्तानी आणि काश्मीरी जनतेने त्यांच्या बाजूने कोणीही उभे नाही हे जाणून घेतले पाहिजे.हे मुद्दा पुढे नेणे फार कठिण आहे. सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यांपैकी कोणीही व्हिटो पावर वापरू शकतो,”असे कुरेशी यावेळी म्हणाले.

“संयुक्त राष्ट्राच्या स्थायी सदस्यांचे भारताशी हितसंबंध आहेत. तसेच त्यांनी भारतात कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. अशा परिस्थितीत त्यांची पाकिस्तानला साथ मिळणे कठिण बाब आहे. देश काश्मीरी जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर लढत आहे,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये कुरेशी यांनी माध्यमांशी ते बोलत होते.भारताने कलम ३७० रद्द केल्यानंतर १४ ऑगस्ट रोजी काश्मीर एकता दिवस आणि १५ ऑगस्ट रोजी काळा दिवस साजरा करणार असल्याचे घोषणा पाकिस्तानने केली होती.भारतानेही आपली प्रतिक्रिया देत कलम ३७० रद्द करणे हा आपला अंतर्गत विषय असल्याचे म्हटले होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा