पुणे : अतिवृष्टीमुळे आठ दिवसांपूर्वी पुण्याहून सांगलीला जाणार्‍या सर्व प्रकारच्या बसच्या फेर्‍या दोन्ही बाजुने रद्द करण्यात आल्या होत्या. परिणामी गाड्यांअभावी दोन्ही बाजुने ठिकठिकाणी प्रवासी अडकले होते. अद्यापही हा मार्ग वाहतूकीसाठी खुला झाला नसल्याने दोन्ही बाजुच्या प्रवाशांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कधी सुरू होणार असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

अतिवृष्टीमुळे सांगली शहर आणि परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. पुरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. सांगली शहराशी संपर्क तुटला होता. त्यामुळे वाहतूकीला मार्गच खुला नसल्याने नाईलाजास्तव एसटी प्रशासनाने या मार्गावरील बसच्या फेर्‍या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सद्य:स्थितीतही मार्गावर ठिकठिकाणी पाणी साचलेले आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर राडारोडा विखुरलेला आहे. त्यामुळे एसटी प्रशासनही रस्ते रिकामे होण्याची प्रतिक्षा करत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा